लोकमान्य टिळक भाषणे मराठी/हिंदी/इंग्रजी Lokmanya Tilak Speech Marathi,Hindi,English



लोकमान्य टिळक

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी

मिळवणारच."

          अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak) यांचा जन्मदिवसा निमित्त आपण येथे जमलो आहोत. आपण माझे भाषण शांतचित्ताने ऐकून ध्यावे ही नम्र विनंती.

          भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. पुण्यात आणि मुंबईत प्लेग ची साथ पसरली होती. तिच्या वर उपाय योजनेच्या नावाखाली इंग्रजांनी लोकांवर खूप अत्याचार केले. औषधे फवारणीच्या निमित्ताने लोकांना घराबाहेर काढले. नासधूस केली. स्त्रियांवर अत्याचार केले. अश्या या जुलमी राजवटी विरोधात "ह्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?" असा जळजळीत अग्रलेख लिहिणारे थोर नेते होते "लोकमान्य त्यांचे पूर्ण नाव "बाळ गंगाधर टिळक" होते. त्यांच्या जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरीतील चिखली ह्या गावी झाला. त्यांचे खरे नाव केशव गंगाधर टिळक होते. पण घरात सर्व त्यांना लाडाने "बाळ" म्हणत. पुढे त्यांचे "बाळ" हेच नाव राहिले. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक आणि आईचे नाव पार्वतीबाई टिळक असे होते.      

           लहानपणा पासून टिळक खूप हुशार होते. गणित हा त्यांचा आवडीचा विषय होता. लहानपणा पासून ते स्पष्टवक्ते होते. एकदा वर्गात काही मुलांनी शेंगा खाल्ल्या आणि त्याची टरफले तिथेच टाकली. गुरुजींना वाटले ती टरफले टिळ्कांनी टाकली. त्यांनी त्यांना सर्व टरफले उचलायची शिक्षा दिली. पण टिळक कुठले ऐकतात, त्यांनी गुरुजींना निक्षून सांगितल, "मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही" असे हे टिळक नेहमी खरं बोलायचे. पुढे टिळकांनी खूप शिक्षण घेतले. त्यांनी वकिलीची परीक्षा पास केली. 

           लहानपणापासून त्यांना व्यायामाची आणि खेळाची खूप आवड होती. आपल्या मित्रांसोबत ते कुस्ती सारखे खेळ खेळायचे. त्यामुळे त्यांची तब्येत ठणठणीत झाली होती. पुढे त्यांनी आपल्या मित्रांसोबत १९८० मध्ये "डेक्कन एज्युकेशन सोसायटी" (Deccan education society) ची स्थापना केली. भारतीय मुलांना चांगले शिक्षण मिळावे हा त्यांचा हेतू होता. इंग्रजांच्या अन्यायाविरोधात भारताच्या स्वातंत्र लढ्यात त्यांनी उडी घेतली. होमरूल चळवळीची सुरुवात टिळकांनीच केली. त्यांनी "केसरी" आणि "मराठा" हि वर्तमानपत्रे चालू केली. त्यातून त्यांनी इंग्रंजांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळेच लोकमान्य टिळकांना "भारतीय आसंतोषाचे जनक" म्हटले जाते. टिळकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले कि "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच". (Swaraj)

            टिळकांच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्रजांनी त्यांना अनेकवेळा तुरुंगात टाकले पण आपल्या भारत भूमीसाठी त्यांनी ती शिक्षा हसत हसत भोगली. मंडाले च्या तुरुंगात असतांना त्यांनी "गीता रहस्य" हा महान ग्रंथ लिहिला. आज आपण खूप उत्साहाने सार्वजनिक 'गणेश उत्सव' आणि 'शिवजयंती' (Ganeshotsav and Shiv Jayanti) साजरी करतो. त्याची सुरुवात लोकमान्य टिळकांनी (Lokmanya Tilak) केली. सार्वजनिक उत्सवामुळे लोक एकत्र येतात. त्यांच्यात आपुलकी निर्माण होते. म्हणून त्यांनी हे उत्सव सुरु केले. त्या काळात ह्या सार्वजनिक उत्सवामुळे त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्य लढ्याची भावना जागृत केली, त्यांच्या ह्या कामामुळे लोकांनी त्यांना "लोकमान्य" म्हणजे लोकांना मान्य असलेले अशी पदवी त्यांना बहाल केली.     

            टिळकांकडून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शिकण्यासारखे खूप आहे. आपण पण त्यांच्या प्रमाणे खूप शिकले पाहिजे. आपल्या भारत देशावर नेहमी प्रेम केले पाहिजे. नेहमी खरे बोलले पाहिजे. मोबाईल पेक्षा आपण मैदानात आणि खेळात वेळ घालवला पाहिजे. सर्वांनी आदराने आणि प्रेमाने राहिले पाहिजे.

अश्या ह्या महान नेत्याला माझे कोटी कोटी नमन... जय

हिंद जय महाराष्ट्र!





लोकमान्य तिलक पर हिंदी भाषण Lokmanya Tilak Hindi Speech

माननीय मुख्य अतिथि, आदरणीय प्रधानाचार्य महोदय, शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तों....

मेरा नाम अजय हैं। आप सभी को मेरा प्यारभरा नमस्कार !

आज मैं आपके सामने "स्वराज मेरा जन्मसिद्ध अधिकार है और इसे मैं लेकर रहूँगा!"

ऐसा साहसभरा नारा देनेवाले एक महान स्वतंत्रता सेनानी लोकमान्य तिलक (Lokmanya Tilak) इस विषय पर अपने विचार प्रस्तुत करने जा रहा हूँ। 

लोकमान्य तिलक भारतीय स्वतंत्रता सग्राम के महान स्वतंत्रता सेनानी थे। उनका जन्म 23 जुलाई 1856 में महाराष्ट्र के रत्नागिरी जिले के चिखली गाव में हुआ था। उनका पूरा नाम बाल गंगाधर तिलक (Bal Gangadhar Tilak) था। उनके पिता का नाम गंगाधर और माता का नाम पार्वतीबाई था। 

वे बचपन से ही मेधावी छात्र थे और वे अन्याय के विरूद्ध थे। उन्होंने पुणे के डेक्कन कॉलेज में अपनी शिक्षा पूरी की और वकालत की उपाधि भी प्राप्त की।

लोकमान्य तिलक जी ने 'केसरी ' और 'मराठा' (Kesari and Maratha) नामक समाचार पत्रों का संपादन किया। इन समाचार पत्रों के माध्यम से लोगों में राष्ट्रीय जागृती पैदा की।

उन्होंने लोगों को इकट्ठा लाने और जनजागृती के लिए महाराष्ट्र में 'गणेश उत्सव' तथा 'शिवजयंती उत्सव' (Ganeshotsav and Shiv jayanti) प्रारंभ किया। इन त्योहारों के माधयम से उन्होंने जनता में देशप्रेम और ब्रिटिश सरकार के अन्यायों के विरूध्द साहस भरा।

लोकमान्य तिलक जी को हिंदू राष्ट्रवाद का पिता भी कहा जाता है। इन्होने अपना संपूर्ण जीवन देशसेवा के लिए अर्पित किया। वे अपने क्रांतिकारी विचारों के लिए जाने जाते हैं।

दुर्भाग्यवश 1 अगस्त 1920 को उन्होंने आखरी साँस ली।

लोकमान्य तिलक जी के विचार आज भी हमें प्रेरित करते है।भारत के इस वीर सपूत को मेरा शत् -शत् प्रणाम !

जय हिंद, जय भारत!





Lokmanya Tilak 10 Lines English Speech

Good morning,

Respected teacher and my dear friends..

My name is Ajay, I study in 5th class.

Today, I am going to tell you about Lokmanya Tilak.

Lokmanya Tilak was an Indian freedom fighter.

His full name was Bal Gangadhar Tilak.

He was born on 23rd July 1856 in Chikhli, Ratnagiri Maharashtra.

He is popular statement was "Swaraj is my birthright and I will get it".

Lokmanya Tilak started newspapers 'Kesari' and 'Maratha'.

He also gathered people by organising festivals Ganeshotsav and Shiv jayanti.

He was first leader of Indian national moment. He was died on 1st August 1920.

Jay Hind, Jay Maharashtra.





लोकमान्य टिळक भाषण चारोळ्या Lokmanya Tilak Charolya


सिंहगर्जना करायला काळीज पण सिंहाचे लागते!

म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते!!


ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले सर्व भारतीय लोक!

ते निर्भीड वक्ते, तडफदार नेते लोकमान्य टिळक!!


स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना दिली! 

भारतीय जनतेत स्वतंत्र प्राप्तीची प्रेरणा निर्माण केली!!


राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नाही, सरकारचे डोके आहे का ठिकाणावर!

असे अग्रलेख लिहून ज्यांनी कोरडे ओढली इंग्रज सरकारवर!!


दडपशाही आणि तुरुंगवासाची त्यांनी परवा नाही केली!

सतत सिंहासारखी सिंह गर्जनाच त्यांनी दिली!!



(Lokmanya Tilak Speech Marathi, Hindi, English, Lokmanya Tilak Speech, लोकमान्य टिळक भाषण, लोकमान्य तिलक भाषण)



Post a Comment

0 Comments