पायाभूत चाचणी गुण चाटबोटवर कसे नोंदवावे How to Use ChatBot PAT-1 ChatBot


            विद्या समीक्षा केंद्र (VKS), पुणे यांचे मार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबोट पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-1 गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-1 शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबोटवर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-1 चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना सोबत देण्यात येत आहे. तसेच याबाबतच्या हिडीओची युट्यूब लिंक प्रस्तुत कार्यालयाच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. 

🔴 कालावधी 👇

राज्यातील शिक्षकांना पायाभूत चाचणी (PAT-1) चे गुण दि. 27 जुलै 2024 ते दि. 20 ऑगस्ट 2024 PAT (महाटाष्ट्र) या नोंदविणेकरिता चाटबोटवर जिल्ह्यांना कालावधी देण्यात येत आहे.

            उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथ./माध्य. शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा.न.पा. यांनी कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VKS), पुणे यांचे मार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबोटवर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-1 चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-1 घेण्यात आलेली आहे. अशा इयत्त तिसरी ते नववीच्या शाळांमधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबोटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी.

🔴 गुणांची नोंद करण्यासाठी लिंक 👇

https://bit.ly/PAT-MH


🔴 चाटबोटच्या तांत्रिक अडचणीसाठी
खालील लिंकवर क्लिक करा 👇

https://forms.gle/9ssWv4bu5QPCq6XHA

🔴 चाटबोट मार्गदर्शिका 👇

https://bit.ly/PATUserManual

डॉ. शोभा खंदारे
राज्य शैक्षणिक संधोधन
व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे.

Post a Comment

0 Comments