शिक्षक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे! (Important Documents for Teacher Recruitment)


शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल दिनांक 24 मार्च रोजी ibps द्वारे प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये बर्‍याच उमेदवारांनी चांगले यश संपादन केले आहे. सरकारने 68000 जागांपैकी 34000 जागा भरण्याचे घोषित केले आहे. त्याची प्रक्रिया एप्रिल महिन्यात होणार असल्याचे घोषित केले आहे.

या प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी पुढीप्रमाणे शैक्षणिक कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे.

शैक्षणिक कागदपत्रे खालीलप्रमाणे.

🔰 शिक्षक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे 🔰


🛑 1) मोबाईल नंबर
🛑 2) ईमेल आयडी
🛑 3) सही, पत्ता, जन्मतारीख
🛑 4) ओळख पत्र (आधार कार्ड/पॅनकार्ड/मतदान कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स)
🛑 5) निवड यादीतील- अनु क्रमांक
🛑 6) उमेदवाराच्या अर्जाची स्वप्रमाणित प्रत
🛑 7) जन्म तारखेचा (शाळा सोडल्याचा) दाखला
🛑 8) एस एस सी गुणपत्रक व प्रमाणपत्र
🛑 9) एच एस सी गुणपत्रक व प्रमाणपत्र
🛑 10) पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र
🛑 11) पदव्युत्तर गुणपत्रक व प्रमाणपत्र
🛑 12) डीएड गुणपत्रक व प्रमाणपत्र
🛑 13) बीएड गुणपत्रक व प्रमाणपत्र
🛑 14) टिईटी / सिटिईटी गुण व प्रमाणपत्र
🛑 15) Tait परीक्षा गुण व प्रमाणपत्र
🛑 16) जात प्रमाणपत्र (Cast certificate)
🛑 17) जात वैधता प्रमाणपत्र (Validity)
🛑 18) अधिवास प्रमाणपत्र (Domocile)
🛑 19) लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र/प्रमाणपत्र
🛑 20) MS-CIT प्रमाणपत्र
🛑 21) नावात बदल असल्यास (Marriage certificate/Affidavit/Gazette.)
🛑 22) महिला आरक्षण प्रमाणपत्र लागू असल्यास
🛑 23) नॉन क्रिमीलिअर लागू असल्यास
🛑 24) पेसा क्षेत्रातील असल्यास (अज फक्त) मुळ अधिवास ठिकाण प्रमाणपत्र
🛑 25) उमेदवार - खेळाडू, अपंग, प्रकल्पग्रस्त/भुकंपग्रस्थ, माजी सैनिक, अंशकालीन, लागू असल्यास प्रमाणपत्र.

एखाद दुसरा कागद अपुर्ण असेल तर 6 महिने मुदत दिली जाते, संमतीपत्रक जोडला जावा

👉 समांतर आरक्षण असेल तर 

जसे की , अपंग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, आत्महत्या ग्रस्त पाल्य, स्वातंत्र्य सैनिक पाल्य, विधवा, घटस्फोटित, इ. चे NOC झालेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.


जिल्हा व शाळा निवड

👉 जर तुम्हाला TAIT परीक्षेत जास्त मार्क्स असतील तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यापासून पसंतीक्रम देऊ शकता.

👉 जर तुम्हाला TAIT परीक्षेत सरासरी किंवा त्यापेक्षा कमी गुण मिळाले आहेत तर तुम्ही विदर्भ, कोकण किंवा खानदेश या जिल्हा प्रमाणे पसंतीक्रम देऊ शकता.

👉 ज्या जिल्ह्यात जास्त जागा आहेत तिथे तेवढ्याच प्रमाणात पसंतीक्रम येतो हे लक्षात असू द्यावे.

👉ज्या उमेदवारांचे फक्त DEd / DTEd झाले आहे.(TET/CTET अपात्र आहेत) आणि C-TET ॲपिअर म्हणून TAIT परीक्षा दिली. 

यामध्ये जे उमेदवार CTET नापास झाले. त्यांनी कृपया पवित्र पोर्टलला नोंदणी करू नये.. कारण Documents Verification ला असे उमेदवार अपात्र होतील.

अपात्र उमेदवारांनी नोंदणी केल्यास TET/ CTET पात्र उमेदवारांचे नुकसान होऊ शकते. 

ह्या भरतीमध्ये Waiting List नसते. त्यामुळे अपात्र उमेदवारांची सिलेक्शन झालेली जागा रिक्तच राहते.. 

BEd पात्रताधारक उमेदवार TET / CTET अपात्र असतील तरी पवित्र पोर्टलला नोंदणी करू शकतात. इयत्ता - ९वी ते १२वी करीता..

Registration साठी प्रक्रिया लवकरच चालू होईल.

👉पवित्र पोर्टल वर नोंदणी तर सर्वच विद्यार्थी करणार आहेत पण 70-80 मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यानी थोड काळजी पूर्वक नोंद करा. 

👉 ज्यांना TAIT परीक्षेत 70- 80+ मार्क्स आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपले Documents तयार ठेवा.

👉 आज cut off कोणीच सांगू शकत नाही कारण 👇

१. मार्क जरी कमी जास्त असतील तरी कोणाचं D.ed तर कोणाचं B.ed आहे.

२. कोणी TET/CTET पास आहे तर कोणाकडे ते पण नाही.

३. 1 ते 12 वी पर्यंतचे वेगवेगळे स्तर आहेत.

४. प्रत्येक शाळेत रिक्त पदांचे विषय वेगवेगळे आहेत.

५. रिक्तपदांचे संचमान्यतेनुसार आरक्षण वेगवेगळे आहे.

६. समांतर आरक्षण पण आहे.

७. शाळा: ZP/Govt./अनुदानित ई. प्रकार आहेत.

८. शासनाची संचमान्यतेनंतर जाहिरात आल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल.

👉त्यामुळे आताच कोणी हार मानू नये आणि उगाचं मला मार्क कमी आलेत म्हणून नाराज होऊ नये.

👉 सर्वांनी कागदपत्र तयार ठेवावे.

महत्त्वाची टीप: फॉर्म भरताना पहिल्याच दिवशी किंवा एकदम शेवटी भरू नये.

सुरू झाल्यावर दोन ते तीन दिवसांनी भरावा. 

कृपया ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावी.

#pavitrportal registration 2023

#TAIT registration 2023

#शिक्षक अभियोग्यात व बुद्धिमत्ता परीक्षा मेरिट यादी.

Post a Comment

0 Comments