महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार free sewing machine scheme 2023


महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार free sewing machine scheme 2023

सरकार देशातील महिलांना शिलाई मशीन मोफत free sewing machine scheme 2023 देत आहे, देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकार कडून अनेक योजना राबविल्या जातात. देशातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे असा सरकारचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच केंद्र सरकारकडून महिलांना मोफत शिलाई मशीन या योजनेंतर्गत शिलाई मशीन मोफत म्हणजेच १००% अनुदानावर दिले जात आहे. तर मित्रांनो मोफत शिलाई मशीन या योजनेचा लाभ कसा घ्यावा, यासाठी अर्ज कसा व कुठे करावा, लाभ घेण्यासाठी पात्रता काय असणार आहे, कागदपत्रे कोणती लागतील, ही योजना सध्या कोणकोणत्या राज्यात सुरु आहे ही सर्व माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन (free sewing machine scheme 2023)

केंद्र सरकारची (Central Government) मोफत शिलाई मशीन ही योजना खास करून देशातील महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महिलांना अगदी मोफत शिलाई मशिन दिली जाते. या योजनेचा लाभ गावातील महिला तसेच शहरातील महिला सुद्धा घेऊ शकतात. या योजेंतर्गत गोरगरीब महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हा शासनाचा उद्देश आहे.

मोफत शिलाई मशीन कोणाला मिळणार ?

• अर्जदार महिला भारताची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
• देशातील गरजू महिलांना या योजनेंतर्गत लाभ दिला जाईल.
• महिला अर्जदाराच्या पतीचे वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपयापर्यंत असावे.
• ‘विधवा आणि दिव्यांग महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल.
• लाभ घेणाऱ्या महिलांचे वय २० ते ४० वर्ष असावे.


ही योजना कोणकोणत्या राज्यात सुरु आहे ?

मित्रांनो ही योजना महाराष्ट्र, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात हि योजना सुरु आहे. इतर राज्यात हि योजना सुरु करण्यात येणार आहे.


अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे 

1. अर्ज (Application)
2. आधार कार्ड (Aadhar Card)
3. ओळख पात्र (ID Card)
4. वयाचा दाखला (Age Proof)
5. मोबाईल नंबर (Mobile number)
6.  पॅन कार्ड (Pan card)
7. अपंग दाखला (अपंग असल्यास)
8. निराधार विधवा असल्यास प्रमाणपत्र
9. पासपोर्ट साईज फोटो (Passport)
10. मतदान कार्ड (Voter ID)

आता अर्ज करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा


अर्ज कसा व कुठे करावा ?

मित्रांनो या योजनेचा अर्ज ऑफलाईन करायचा असतो. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्जाचा नमुना लागणार आहे तो यामध्ये दिलेला आहे. हा अर्ज पूर्ण भरून घ्यायचा आहे. अर्ज भरून घेतल्यानंतर त्या अर्जासोबत दिलेल्या प्रमाणे सर्व कागदपत्रे जोडून तुम्हाला तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये जाऊन तिथे संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे.

अर्ज जमा केल्यानंतर अर्जावरती दिलेल्या मोबाईल नंबर वर तुम्हाला काही दिवसानंतर फोन येईल. तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर फोन येईल व त्यानंतर डाक्युमेंट व्हेरीफिकेशन केले जाईल व त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीनचे वाटप केले जाईल.


अशाप्रकारे महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन या विषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहिलेली आहे. अशीच नवनवीन माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या https://jmeduhelp.blogspot.com या वेबसाईट ला भेट देत रहा. धन्यवाद.

Post a Comment

0 Comments