मित्रहो नमस्कार, कालच महाराष्ट्र राज्य
परीक्षा परिषद (MSCEPUNE.IN) तर्फे शिक्षक भरतीसाठी जाहिरात (Notification) प्रसिद्ध
करण्यात आली आहे. आज याठिकाणी आपण शिक्षक भरती जाहिरात २०२२ (Tait Exam
Notification 2022) बद्दल सविस्तर माहिती घेऊया. याठिकाणी आपल्याला
अर्ज कधी सादर
करावा?
(Tait Exam online Form Fill up | MAHA TAIT Exam Date 2023)
· परीक्षा कशी
असेल?
· परीक्षा कधी
होईल?
· शिक्षक भरतीसाठी
ऑनलाईन अर्ज (Tait Exam Online Form fill up) कसा करावा?
· फी किती असेल?
· या परीक्षेसाठी
कोण कोण पात्र असेल?
· यासंदर्भात
सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत.
१. कोणत्या शाळेसाठी ही परीक्षा होईल?
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र' या संणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता 'शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२' या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज मागविण्यात येत आहेत. म्हणजेच
(झेडपी शाळा, खाजगी संस्थांमध्ये नियुक्तीसाठी पवित्र पोर्टलव्दारे
भरती प्रक्रिया राबविली जात आहे.)
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक - येथे क्लिक करा
1. ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी - दिनांक ३१/०१/२०२३ ते दिनांक ०८/०२/२०२३
2. ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक - दि. ०८/०२/२०२३ रोजी २३:५९ वाजे पर्यंत.
3. प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी - १५ फेब्रुवारी २०२३
4. ऑनलाईन परीक्षा दिनांक विहित कालावधी - दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ०३/०३/२०२३
5. फी-अर्ज
करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ९५० रु तर राखीव उमेदवारांना ८५० रु एवढी
फी लागेल.
Tait Exam Online Form fill up Demo - Click
Here
२. शिक्षक भरती पदसंख्या: (Teacher vacancy 2023)
राज्यातील शिक्षण सेवकांच्या शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती, विषय, प्रवर्ग, माध्यम व बिंदू नामावली नुसार “पवित्र” (PAVITRA-Portal
For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीव्दारे प्रसिध्द करण्यात येईल.
३. परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रमः (Tait exam 2023
syllabus)
परीक्षेचे माध्यम : परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असेल. भाषिक क्षमता (मराठी) व भाषिक क्षमता (इंग्रजी) यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न व्दिभाषिक असतील. त्यामुळे परीक्षार्थीनी इंग्रजी मराठी अथवा इंग्रजी - उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे.
अभ्यासक्रम:
( Tait exam syllabus )
परीक्षा एकूण २०० गुणांची राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे दोन घटक राहतील.
घटक
1) अभियोग्यता.
- १२० गुण
- १२० प्रश्न
2) बुध्दिमत्ता
- ८० गुण - ८० प्रश्न
एकूण प्रश्न २०० असतील, आणि १२० मिनिटाचा वेळ असेल.
अभियोग्यता या घटकांत खालील घटक समाविष्ट असतील.
अ) अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता, (मराठी), अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन, व्यक्तीमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.
ब) बुध्दिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.
ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही.
क) परीक्षा कालावधी : परीक्षेसाठी दोन तासांचा (१२० मिनिट) कालावधी राहील.
·
सविस्तर
अभ्यासक्रम पाहण्यासाठी - येथे क्लिक करा
उमेदवारांची
पात्रता ( tait exam eligibility )
१. भारतीय नागरीक असावा
२. वयोमर्यादेबाबत शासन वेळोवेळी शासन निर्णयाव्दारे
विहित करील, अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना/ शिक्षकांना लागू होईल.
३. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः शालेय
शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण २०१८/प्र.क्र.३९७/टीएनटी-१, दि. ०७ फेब्रुवारी २०१९, शासनशुध्दीपत्रक २५ फेब्रुवारी २०१९, १६ मे
२०१९, १२ जून २०१९ तसेच शासनाचे वेळोवेळीच्या आदेशानुसार
अर्हताप्राप्त उमेदवार सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र
असतील.
प्रस्तुत जाहीरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी
विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अनुषंगिक
अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक; (tait exam official website)
- येथे क्लिक
करा
शिक्षक भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट मिळविण्यासाठी आपल्या https://jmeduhelp.blogspot.com/ वेबसाईटला भेट देत रहा.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणाली द्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. या परीक्षेसाठी 31 जानेवारी 2023 पासून आवेदन सुरू होऊन 8 फेब्रुवारी 2023 पर्यंत उमेदवारांना आवेदन करता येणार आहे. या परीक्षेला 22 फेब्रुवारी 2023 पासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी सर्व डीएड आणि बीएड तसेच टीईटी आणि सिटीईटी अर्हताधारक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 950 आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये परीक्षा शुल्क द्यावे लागणार आहे. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांना काही अडचण उद्भवल्यास msce.tait2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन परीक्षा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments