निबंध
गुरुपौर्णिमा Gurupaurnima Essay
आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूला ईश्वराचे स्थान दिले आहे. गुरू हे आपल्या आयुष्यातील अंध:कार दूर करून आपल्याला प्रकाशाकडे नेतात. भारतात आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. कारण आदिगुरू महर्षी व्यास यांचा जन्म या दिवशी झाला होता.
भारताला गुरू-शिष्य यांची मोठी परंपरा लाभलेली आहे. जसे की विश्वामित्र-राम, शुक्राचार्य-जनक, कृष्ण-सुदामा, द्रोणाचार्य- अर्जुन इ. या गुरू-शिष्यांचा इतिहास पाहिल्यास प्रेम,निष्ठा यांची खरी ओळख पटते.
आपले पहिले गुरू हे आई-वडिल असतात. ते लहानपणापासून आपले संगोपन करतात, आपल्यावर चांगले संस्कार करतात. यानंतर आपले पहिले गुरु आपले शिक्षक असतात. ते आपल्याला ज्ञान देतात. नवनवीन विचार शिकवतात. चांगले लेखन व वाचन करायला शिकवतात. आपणांस कला, कीडा, साहित्य इत्यादी क्षेत्रात तरबेज करतात.
गुरू हे ज्ञानाचे भांडार असतात. गुरूपौर्णिमा हा दिवस त्यांच्याप्रती विशेष आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंचे भेटवस्तू देऊन स्वागत करतात. गुरू हे ज्ञानाचा सागर असतात. आपण त्यांनी दिलेले ज्ञान आत्मसात करून पुढच्या पिढीपर्यंत पोहचवायला हवे. गुरूंचे महत्व अगाध आहे. ते कोणात्याही शब्दात व्यक्त करता येणार नाही.
गुरुपौर्णिमा भाषण Gurupaurnima Speech
सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
माझे नाव रामकुमार शर्मा आज आपण या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वजण एकत्र जमलेलो आहोत.
आपल्या सर्वांच्या जीवनातील गुरूंचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिलेले आहे. कारण गुरु आपल्या अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात.
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्या गुरुंप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय.
आई-वडील पंख देतात आणि त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. भविष्यातील एक चांगला नागरिक घडविण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूंचाच प्रभाव असतो. गुरु हे आपल्या शिष्याला योग्य दिशा दाखवतात. या जीवनात मला अभिमानाने जगायला शिकवलं अन्यायाविरुद्ध लढाईला शिकवलं.
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे ऋणी राहील शेवटी एकच म्हणू इच्छिते/इच्छितो की
गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे
मूल आयुष्याचे जाणून घ्यावे …….
गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे
चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे ……..
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद!
गुरुपौर्णिमा कविता Gurupaurnima Poem
गुरु शिष्याचे जगात सर्व नात्याहून न्यारे असते नाते,
गुरु शिष्याचे झुकून नमन करतात सारे.
जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे,
झुकून नमन करतात सारे.
सजीव निर्जीवांकडून मिळालेली प्रेरणा ही गुरुच असते,
मनामध्ये उठलेला आशीचा ध्यास आन नवनिर्मितीची आसही गुरुच असते.
काय कीर्ती वर्णावी गुरूंच्या अगम्य महतीची,
कठीण प्रसंगी ही आठवण होते फक्त त्यांच्याच सोबतीची.
दिशादर्शक बाल असतो गुरु संस्काराची खान असतो,
गुरु प्रगतीचे पंख असतो गुरु कर्तुत्वाच्या रणांगणावरील शंख नाद असतो.
ध्यास किर्तीचा गुरु असतो श्वासपूर्तीचा गुरु असतो,
मार्ग यशाचा गुरु असतो किरण असेचा गुरु असतो.
0 Comments